महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराने चांगलाच रंग पकडला असून. खडकवासल्याचे सोनेरी आमदार स्वर्गीय रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश रमेश वांजळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.
मयुरेश वांजळे यांच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आले होते. या सभेदरम्यान मयुरेश वांजळे यांच्या मातोश्री हर्षदा वांजळे यांनी आक्रमक भाषण केलं असून सध्या हे भाषण सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आहे.
या भाषणात कार्यकर्त्यांना आवाहन करताना हर्षदा वांजळे म्हणाल्या की आपल्यासमोर जे उमेदवार आहेत, ते व त्यांचे कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहेत. मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुम्ही त्यांच्या दमदाटीला भीक घालू नका.
न घाबरता मयुरेशसाठी काम करा. तुमचा तडफदार, शिकलेला उमेदवार विधानसभेत पाठवा. मयुरेशचा प्रचार करत असताना तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा इथे तुमची आई उभी आहे.
मी केवळ मयुरेशची आई नाही, मी तुमची देखील आई आहे. तुमच्या केसाला जरी कोणी धक्का लावला तरी त्यांचे पाय तोडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही