praful patel

रोहित पवारांच्या आरोपांनंतर प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा; ‘त्या’ रात्रीच्या फोन चर्चेची माहिती समोर

43 0

रोहित पवार(ROHIT PAWAR) यांनी उपस्थित केलेल्या फाईल संदर्भातील आरोपांनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. संबंधित फाईल प्रफुल्ल पटेल(PRAFUL PATEL) यांच्या माध्यमातूनच आल्याची माहिती समोर आली असून, याबाबत पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

प्रफुल्ल पटेल (PRAFUL PATEL)यांनी सांगितले की, त्यांनी अजित पवार(AJIT PAWAR) यांच्याशी रात्री सुमारे 8.30 वाजता दूरध्वनीवर संवाद साधला होता. तसेच, दादांच्या निधनाच्या आदल्या रात्रीदेखील याच सुमारास त्यांच्याशी चर्चा झाली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

या चर्चेत शेतकरी संबंधित प्रलंबित कामे आणि जिल्हा परिषद (ZP) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. “आपली पुढील भेट कधी होईल?” असा प्रश्न विचारल्यावर अजित दादांनी (AJIT DADA), “मी पुढील सात-आठ दिवस दौऱ्यावर असेल, त्यामुळे सध्या भेट होणे शक्य नाही,” असे उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल(PRAFUL PATEL) यांनी ही माहिती अजित दादांच्या (AJIT DADA) शोकसभेत उपस्थितांशी संवाद साधताना मांडली. या खुलाशानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!