आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अनेक जागांवर रस्सीखेच होणार असून पुणे जिल्ह्यातील इंदापूरच्या जागेनंतर आता दौंड विधानसभा मतदारसंघावरूनही भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे..
भाजपाचे राहुल कुल आमदार असलेल्या दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडे मागणी केली आहे.
लोकसभा निवडणुकी वेळी बारामती लोकसभेतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवावी अशी पहिली मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली होती व ती मागणी मान्य देखील झाली होती.
त्यानंतर आता वीरधवल जगदाळे यांनी दौंड विधानसभेच्या जागेवर मागणी केली आहे. वीरधवल जगदाळे यांच्या मागणीनंतर दौंडच्या जागेवरून महायुतीत वादाची शक्यता आहे