आदित्य ठाकरेंच्या ‘या’ विश्वासू शिलेदाराचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

555 0

शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांचे शिवसेनेत आऊटगोइंग सुरूच असून त्यात दिवसेंदिवस अधिकाधिक भर पडत आहे. त्यातच ठाकरेंचा अत्यंत विश्वासू सहकारी उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

राहुल कनाल यांनी आज ठाकरे गटाला राजीनामा दिला. वांद्रे पश्चिम मतदारसंघातील सर्व युवासेना युवक पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आल्यानंतर राहुल कनाल यांनी ठाकरे गटाविरोधात पाहिलं ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी असे सांगितले आहे की, ‘दुःख होतंय !!! हे कोणी केलंय हे चांगलंच माहीत आहे. पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं आहे त्यांना न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार आहे आणि तुम्ही मला हटवू शकलात पण त्या लोकांना नाही ज्यांनी रात्रंदिवस काम केलंय. चला चांगले आहे की सर्वांना माहिती पडले की अहंकार काय असतो.’

राहुल कनाल नाराज असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. ते युवासेनेच्या कोअर कमिटीच्या व्हाट्सअॅप ग्रुपवरुन लेफ्ट झाले, अशी माहिती समोर आली होती.राहुल कनाल यांनी, “मी माझा निर्णय लवकरच जाहीर करेन”, असं म्हटलं आहे. या चर्चांवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “ठाकरे गटाला आता अनेक धक्के बसणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!