महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत असून इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आम आदमी पक्षानं महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीला मोठा धक्का दिल्याचा पाहायला मिळतंय.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा आप कडून केली गेल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व म्हणजे 288 विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षानं चाचपणी सुरू करत तीन उमेदवारांची घोषणाही केली आहे.
आम आदमी पक्षांना परभणी बीड आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा केली आहे. परभणी विधानसभा मतदारसंघातून सतीश चकोर यांना आम आदमी पक्षाने उमेदवारी दिली आहेत तर बीडमधून अशोक येडे पाटील तर लातूर ग्रामीण मधून अश्विन नलबले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.