अन्यआपला महाराष्ट्रठळक बातम्यातुमच्यासाठी खासपुणेबातम्या पालिकेच्याराजकारणराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीयसुपरफास्ट

पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटींचं अंदाजपत्रक सादर

पुणे महानगपालिकेचं 8,592 कोटीचं अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केलं. यावेळी अंदाजपत्रकात पुणे शहरात नव्याने सहा उड्डाणपूल होणार असून एक नदीवरील पूल तर एक बोगदा प्रस्तावित असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितलं.

त्याचबरोबर पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची शाळा पुन्हा सुरू होणार असून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना प्रस्तावित असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितलं. ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये अग्निशामक यंत्रणा उभारण्याबरोबरच पुण्याचं वैशिष्ट सांगणाऱ्या ऐतिहासिक स्थळांचा पुनर्विकास करणार असल्याचं विक्रम कुमार यांनी सांगितलं