राज्याताील एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी हे मतदान पार पडणार आहे. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबरला घोषित करण्यात येईल.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी हजारो पोलिस कर्मचारी गावागावामध्ये तैनात असतील. तर संवेदनशील असलेल्या गावांमध्ये अधिकचा फौजफाटा देण्यात आला आहे. याचबरोबर अधिकारी आणि कर्मचारी देखील मतदान यंत्रणेमध्ये हजारोंच्या संख्येनं आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींची आहे निवडणूक
अहमदनगर- 203
अकोला- 266
अमरावती- 257
औरंगाबाद- 219
बीड- 704
भंडारा- 363
बुलडाणा- 279
चंद्रपूर- 59
धुळे- 128
गडचिरोली- 27
गोंदिया- 348
हिंगोली- 62
जळगाव- 140
जालना- 266
कोल्हापूर- 475
लातूर- 351
नागपूर- 237
नंदुरबार- 123
उस्मानाबाद- 166
पालघर- 63
परभणी- 128
पुणे- 221
रायगड- 240
रत्नागिरी- 222
सांगली- 452
सातारा- 319
सिंधुदुर्ग- 325
सोलापूर- 189
ठाणे- 42
वर्धा- 113
वाशीम- 287
यवतमाळ- 100
नांदेड- 181
नाशिक- 196
एकूण- 7,751.