BJP

कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? आज होणार निर्णय

937 0

23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून 132 जागा जिंकत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून आता भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं असून आज भाजपाच्या विधिमंडळ गटनेता निवडीचे बैठक विधिमंडळातील सेंट्रल हॉलमध्ये संपन्न होत आहे.

विधिमंडळ गटनेता निवडीपूर्वी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून आजच्या बैठकीत विधिमंडळ गटनेता निवडला जाणार आहे. विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी भाजपाकडून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री छत्तीसगड व पंजाब राज्याचे भाजपा प्रभारी विजय रूपानी यांची निरीक्षक म्हणून निवड केली आहे.

BJP
Share This News
error: Content is protected !!