मुंबई: केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर होते. अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली.
या बैठकीत महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा करू नका, महायुतीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर आणू नका अशा सूचना अमित शाह यांनी महाराष्ट्रातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांना दिल्याचं पाहायला मिळालं.
अमित शहा यांनी बोलावलेल्या याच बैठकीत भाजपा 160 जागा तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रत्येकी 64 सागांवर चाचपणी करत असल्याचं पाहायला मिळतंय