Arrest

यवत सामूहिक बलात्कार प्रकरणी आरोपीना 5 दिवसांची पोलीस कोठडी

333 0

पुणे – यवत येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील आरोपींना बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

बलात्काराची घटना शनिवारी (दि 29) रात्री साडेआठ ते अकराच्या सुमारास यवत जवळ एका निर्जनस्थळी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी अजय बापू चौधरी (वय 22), किरण रोहिदास चौधरी (वय 27), शंकर संपत चौधरी (वय 26, नवनाथ नाना कोकरे (वय 32) (सर्व राहणार खोर) आणि संतोष भगवान चव्हाण (वय 32 , रा. गिरीम, ता.दौंड) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे घटना ?

संबंधित पीडित महिला आपल्या पतीसोबत जेवण करण्यासाठी यवत येथील एका हॉटेलमध्ये गेली होती. पती हॉटेलमध्ये विचारपूस करण्यासाठी गेला असता, विवाहिता बाहेर उभी होती. यावेळी आरोपींनी महिलेला तिच्या भावाचा अपघात झाला आहे, असे खोटे सांगितले. त्यानंतर तिला फसवून तिला दुचाकीवर बसवून सात किलोमीटर अंतरावर नेले. त्यानंतर एका मोकळ्या जागेत तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन यवत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक केली. पाचही आरोपीना बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Share This News

Related Post

Sangli News

Sangli News : दुचाकींची सामोरासमोर धडक होऊन भीषण अपघात ! प्रसिद्ध बिझनेसमनचा मृत्यू

Posted by - September 9, 2023 0
सांगली : सांगलीमध्ये (Sangli News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सांगली शहरातील काँग्रेस भवनजवळ झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात…

महापुरुषांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सर्व धर्मीय शिवप्रेमी पुणेकर संघटनेची पुणे पोलिसांकडे तक्रार

Posted by - December 10, 2022 0
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह शब्दोचारांमुळे महाराष्ट्राचे…
Crime

गुन्हेगार आणि जवानांच्यात चकमक; दोन जवानांचा मृत्यु

Posted by - February 12, 2023 0
झारखंड देवघर येथे एका चकमकीत मासळी व्यावसायिकाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. या हल्यामागचे कारण खंडणी व…

‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध का होतोय ? काय आहे प्रकरण ? जाणून घ्या VIDEO

Posted by - November 8, 2022 0
‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक प्रसंगांवर आक्षेप घेण्यात आलाय. चित्रपटातील अनेक प्रसंग आतापर्यंत सांगितल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *