गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मागील दिवसांपासून त्या ब्रीच कँडी उपचार घेत होत्या. अखेर आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक अशी महत्त्वाची घटना आहे, ज्याचा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम झाला.
लता मंगेशकर यांचे लग्न झालेले नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आजपर्यंत त्यांनी लग्न का केलं नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊन गेला असेल.

त्यामागची कहाणीही अतिशय हृदयद्रावक आहे. लतादीदींबद्दल असं म्हटलं जातं की त्याही कुणाच्यातरी प्रेमात पडल्या होत्या, पण लताजींची प्रेमकहाणी कधी पूर्णच होऊ शकली नाही. कदाचित याचमुळे त्या आजन्म अविवाहित राहिल्या.
लता मंगेशकर यांचे डूंगरपूर राजघराण्याचे महाराजा राज सिंह यांच्यावर खूप प्रेम होते. एवढेच नाही तर लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर हेही महाराजांचे मित्र होते. मात्र, हे प्रेम लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही.

दोघांच्या प्रेमात राजघराणं आलं. सामान्य घरातील कोणत्याही मुलीला आपल्या घरची सून करणार नाही, असं वचन राज यांनी आपल्या पालकांना दिल्याचं सांगितलं जातं. हे वचन राज यांनी मरेपर्यंत पाळलं.
त्याचवेळी, लतादीदींवरही त्यांच्या संपूर्ण घराची जबाबदारी होती, म्हणूनच त्यांनीही पुढे जाऊ कधी लग्न केलं नाही. पण लतादीदींप्रमाणे राजही आयुष्यभर अविवाहित राहिले.

 
                         
                                 
                             
                             
                             
                            