आता व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर, चॅटचा बॅकअप घेता येणार

334 0

नवी दिल्ली – WhatsApp आपल्या यूजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते. आता कंपनी एका नवीन फीचरवर काम करत आहे. हे फीचर आल्यानंतर यूजर्स गुगल ड्राइव्हच्या चॅट बॅकअपला देखील एक्सपोर्ट करू शकतील. म्हणजेच, अन्य सर्व्हर आणि डिव्हाइसमध्ये बॅकअप घेणे शक्य होईल. नवीन अपडेट आल्यानंतर गुगल ड्राइव्हवर स्टोर असलेल्या चॅटला पेन ड्राइव्हमध्ये घेणे शक्य होईल.

या नवीन फीचरबाबत व्हॉट्सअ‍ॅपचे बीटा ट्रॅकर WABetaInfo ने याबाबत माहिती दिली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, नवीन अपडेट आल्यानंतर कोणत्याही WhatsApp चॅटच्या बॅकअपला लोकल डिव्हाइस जसे की पेन ड्राइव्हमध्ये स्टोर करता येईल. या बॅकअपमध्ये टेक्स्ट मेसेजसह फोटो-व्हिडिओ आणि वॉइस मेसेज देखील मिळेल. WABetaInfo ने नवीन फीचरचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे.

याआधी WABetaInfo ने माहिती दिली होती की, व्हॉट्सअ‍ॅप बॅकअपसाठी गुगल ड्राइव्हमध्ये लिमिटेड स्टोरेज मिळेल. त्यामुळे हे नवीन फीचर खूपच उपयोगी येईल. गुगल ड्राइव्ह स्टोरेज फुल झाल्यानंतर यूजर्स चॅटला लोकल डिव्हाइसमध्ये ट्रान्सफर करून ड्राइव्हच्या स्टोरेजला रिकामे करू शकतात. नंतर चॅटला गुगल ड्राइव्हवर अपलोड करणे देखील शक्य आहे. WhatsApp चे हे नवीन फीचर सर्व यूजर्ससाठी कधी जारी होईल, याची अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही. तसेच, नवीन फीचर हे सध्या अँड्राइडसाठी येत आहे. याच्या अपडेटनंतर आयओएस यूजर्सला iCloud वरून बॅकअप मिळेल की नाही, याची माहिती मिळालेली नाही. WABetaInfo नुसार, या नवीन फीचरचे टेस्टिंग WhatsApp बिझनेसचे बीटा व्हर्जन २.२२.१३.१० वर होत आहे. तर आयओएसचे बीटा व्हर्जन २२.१२.०.७३ वर या फीचरचे टेस्टिंग होत आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!