नवीन आयकर विधेयक लोकसभेत मांडण्यात आल आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडल. या विधेयकाद्वारे आयकराशी संबंधित अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे..या नव्या विधेयकात पॅन आणि आधारशी संबंधित अनेक नियम सोपे करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत याचा तुमच्या पॅन आणि आधारवर काय परिणाम होईल? पाहूयात या रिपोर्ट मधून.
1961 च्या कर विधेयकातील अनेक अस्पष्ट तरतुदींमुळे करदाते आणि सरकार यांच्यात वाद निर्माण झाले आहेत आणि त्यामुळे खटल्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे. नवीन कर विधेयक स्पष्ट नियम आणि सोप्या शब्दांसह सादर करण्यात आल आहे, ज्यामुळे ते समजण सोप होईल. नवीन विधेयकानुसार ज्या कर दात्याकडे आधार क्रमांक आहे ते ITR भरण्यास पात्र आहेत. पॅनसाठी अर्ज करताना आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरताना त्यांना त्यांचा आधार क्रमांक द्यावा लागेल. याशिवाय ज्यांच्याकडे पॅन आहे आणि ते आधार क्रमांक मिळवण्यास पात्र आहेत. त्यांना त्यांचा आधार क्रमांक आयकर विभागाला कळवावा लागेल. जर एखाद्या व्यक्तीने आधार क्रमांक दिला नाही तर त्याचे पॅन कार्ड रद्द केले जाईल. पॅनसाठी वापरलेल्या कोणत्याही व्यक्तीचे नाव, पत्ता किंवा व्यवसाय असल्यास व नंतर त्याने त्यात काही बदल केल्यास त्याला ही माहिती आयकर अधिकाऱ्यांना द्यावी लागेल. जर एखाद्या व्यक्तीकडे पॅन नसेल तर अशा स्थितीत तो आपला आधार क्रमांक पॅनच्या स्वरूपातही देऊ शकतो. जर त्याच्याकडे आधीच पॅन असेल तर तो पॅनच्या जागी त्याचा आधार क्रमांक वापरू शकतो. नव्या विधेयकानुसार जर एखादी व्यक्ती कोणताही व्यवसाय करत असेल आणि त्याची एकूण उलाढाल 5 लाखांपेक्षा जास्त असेल..याशिवाय, जर ती व्यक्ती कोणत्याही कंपनी किंवा संस्थेमध्ये संचालक, भागीदार, विश्वस्त अशा प्रमुख पदावर असेल. तसेच जर एखाद्या व्यक्तीकडे आधीच पॅन असेल तर तो एकापेक्षा जास्त पॅनकार्ड घेऊ शकत नाही.