जाहिरातीमधील घड्याळात नेहमी दहा वाजून दहा मिनिटे का दाखवली जातात ?

470 0

नवी दिल्ली- आपण अनेकदा पाहतो जाहिरातीमध्ये दाखवण्यात येणाऱ्या घड्याळात नेहमी दहा वाजून दहा मिनिटे झाल्याचे दिसून येते असे का हा प्रश्न आपल्या मनामध्ये अनेकदा आलेला असेल. या प्रश्नाचे उत्तर आपण आता जाणून घेऊया..

10 वाजून 10 मिनिटे ही वेळ दाखवणारे घड्याळ सममितीय दिसतं. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून माणसाला सममितीय गोष्टी पाहायला आवडतात. तसंच 10:10 या वेळेत घड्याळातले काटे सर्वांत जास्त संतुलित असतात. घडाळ्यातील या वेळेमुळे घड्याळ हे हसतमुख दिसते. म्हणजे स्मायली हो ! अशा लूकमुळे ग्राहकांमध्ये सकारात्मक संदेश जातो आणि जाहिरात सकारात्मक वाटते. असे जाहिरात तज्ज्ञांचे मत आहे.

आपण जेंव्हा दोन बोटे वर करून विजयाचे म्हणजे व्हिक्टरीचे चिन्ह दाखवले जाते. अगदी तसेच चित्र घड्याळातील १० वाजून दहा मिनिटांची वेळ दाखवते.

Share This News
error: Content is protected !!