बालगंधर्व रंगमंदिराबद्दल बोलताना अभिनेत्री विशाखा सुभेदार असे का म्हणाली ?

376 0

मुंबई- कलाकार रंगभूमीची मनोभावे सेवा करत असतात. पण त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतात का ? हा खरा प्रश्न आहे. एखाद्या खेडेगावात नाट्यप्रयोग करताना आलेल्या अडचणी समजून घेता येतील पण पुणे मुंबईसारख्या शहरांच्या ठिकाणी असलेल्या नाट्यगृहात देखील अनेक सोयीसुविधांचा अभाव जाणवतो. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी फेसबुकवर केलेली एक पोस्ट सर्व काही सांगून जाते.

अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने सोशल मीडियावर पोस्ट करत या गैरसोयींनकडे लक्ष वेधले आहे. विशाखा या पोस्टमध्ये म्हणते, पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर आणि अण्णाभाऊ साठे या नाट्यगृहांची दयनीय अवस्था आहे. या नाट्यगृहांत नाटकांसाठी आवश्यक अशा मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे कलाकारांना प्रयोग करताना अनेक अडीअडचणींना सामोरं जावं लागतं.

विशाखाच्या ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाचा प्रयोग नुकताच बालगंधर्वमध्ये झाला. त्यावेळी नाट्यगृहात अनुभवाला आलेल्या गैरसोयींचा पाढा विशाखानं तिच्या पोस्टमध्ये मांडला आहे. विशाखानं या दुरावस्थेबद्दल पोस्ट लिहिल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील नाट्यगृहांच्या गैरसोयींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

विशाखाची पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/vishakha.subhedar/posts/5366115136765294

Share This News
error: Content is protected !!