सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये चक्क एका विमानातच हाणामारी होतानाचे दृश्य पाहायला मिळतंय. विमानातील हा व्हिडीओ इंग्लंड ते नेदरलँड्सच्या KLM फ्लाइट दरम्यान ही घटना घडली असून एका प्रवाशाने हे दृश्य आपल्या मोबाइलमध्ये कैद केले आहे.
मँचेस्टर शहरातून उड्डाण करणारे हे विमान अॅमस्टरडॅमला जाणार होते. हाणामारीत सहा प्रवाशांपैकी एकाला किरकोळ दुखापत झाली. या व्हिडिओमध्ये, क्रू मेंबर फ्लाइट दरम्यान प्रवाशांच्या दोन गटांमध्ये झालेली भांडणे शांत करताना दिसत आहे. विमान शिलोफ विमानतळावर पोहोचले तेव्हा सहा ब्रिटिश प्रवाशांना अटक करण्यात आली.
Nice flight to dam today x pic.twitter.com/4FqulwXN2d
— Maya Wilkinson (@MayaWilkinsonx) May 5, 2022
४५ सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत १७ पेक्षा जास्त स्पेशल व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.