सोफ्यावर बसताच स्फोट, पुढे काय झाले तुम्हीच पाहा (व्हिडिओ )

258 0

मुंबई- सध्या एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पहिला की आपल्याला कल्पना येईल की कधी काय घडू शकते हे सांगता येत नाही. सहजपणे जात जाता अशी काही घटना घडून जाते की मन घाबरू तरी जाते नाहीतर हसून हसून पुरेवाट होते.

या व्हिडिओमध्ये एक तरुण सोफ्यावर आपल्या मित्रांसोबत बसलेला आहे. त्यांच्यासमोर आणखी एक तरुण खुर्चीवर बसला आहे. तिघंही एकमेकांसोबत बोलत बसलेले असतानाच अचानक स्फोट होतो आणि हा तरुण उंच हवेत उडून काही अंतरावर जाऊन पाठीवर पडतो. नेमकं काय घडलं ते सुरुवातीला कुणालाच समजत नाही. पण हा स्फोट एखाद्या बॉम्बचा नसून ज्या सोफ्यावर ते दोघे बसलेले आहेत त्या सोफ्याच्या गादीचा असतो.

ज्यावेळी हे तिघे बोलत असतात त्यावेळी हा तरुण सोफ्यावर मागेपुढे होतो. त्यानंतर आपल्या बाजूने तो एक कापडही बाहेर काढतो. इतक्यात सोफ्याखाली जोराचा स्फोट होतो. अर्थात हा स्फोट सोफ्यामध्ये भरलेल्या हवेचा आहे हे त्यांच्या लक्षात येते.

https://twitter.com/AwardsDarwin_/status/1529884120507113472

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!