पुणे महापालिकेचा ‘माझी वसुंधरा पुरस्कार’ देऊन गौरव

387 0

मुंबई- यावर्षीचा माझी वसुंधरा पुरस्कार पुणे महापालिकेस प्रदान करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान आणि महाराष्ट्र शासन अंतर्गत हा पुरस्कार देण्यात येतो. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जूनला माझी वसुंधरा पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम मुंबई येथे पार पडला.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. यावर्षीच्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेमध्ये राज्यातील महापालिका, नगर पालिका तसेच ग्रामपंचायती सहभागी होतात. यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत पुणे महापालिकेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे शहराचे EV म्हणजे इलेक्ट्रिक वेहिकल सेल स्थापन करून वेगळा आदर्श समीर ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर पुरस्काराच्या तृतीय क्रमांकासाठी पुणे महापालिकेची निवड करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!