युक्रेनवरील हल्ल्यानंतर जगभरातून रशियावर टीका होत आहे.अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. निर्बंधांमुळे भारत आणि रशिया यांच्यातील व्यापारावर विशेषतः शस्त्रसामग्री व्यवहारावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तान सध्या खुशीत आहेत.
* भारताने रशियाकडून 5 एस 400 डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याचा करार केला आहे.
* त्यातील एक सिस्टीम भारताकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
* उर्वरित चार सिस्टीम मिळण्यात विलंब होऊ शकतो कारण रशियाशी केलेल्या करारावर अमेरिका नाराज आहे.
* युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका भारताला एस 400 प्रणाली खरेदी करण्यापासून रोखू शकतो.
* त्यामुळे या क्षेपणास्त्र प्रणालीचा पुढील व्यवहार दोन्ही देश कसे करतील हे पाहणे चिंतेचे ठरेल