घाट परिसरातून जाताना सावधान! पुणे जिल्ह्यातील घाट परिसर पावसाने झोडपले

156 0

पुणे जिल्ह्यात सध्या पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर संततधार पाऊस सुरूअसून शहरासह उपनगरांमध्ये ही पावसाचा जोर वाढत आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहर व परिसरात पाऊस सातत्याने सुरू असून शनिवारपासून पावसाचा जोर अधिकच वाढला आहे.

हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार घाटातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस घाटमाथ्यावरील काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.जिल्ह्यावर सध्या ढगांची दाटी असल्याने बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. जूननंतर जुलै महिन्यात सर्वदूर पावसाची सुरूवात झाली असली तरी हलक्या सरी पडत होत्या.दुपारी तीन वाजेपर्यंत ९.३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. सकाळपासून जोर धरलेल्या पावसामुळे गेल्या सहा तासात शहरात २ सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यातील घाट परिसरात धुवाधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी रस्त्यांची स्थिती खराब असल्याने वाहने चालवणे कठीण झाले आहे. घाटांना लागून असलेल्या सखल भागात पाणी साठण्याची शक्यता झाड पडींच्या घटना घडू शकतात.नागरिकांनी शक्यतो घाटमाथ्याच्या परिसरात जाणे टाळावे.काळजी घ्या ! सुरक्षित राहा !

Share This News
error: Content is protected !!