तेलुगू अभिनेता विश्वक सेनला टीव्ही अँकर स्टुडिओतून बाहेर जाण्यास सांगते तेंव्हा, व्हिडिओ व्हायरल

528 0

हैदराबाद- न्यूज चॅनलवर डिबेट चालू असताना अनेक प्रवक्ते किंवा प्रतिनिधी आपली मर्यादा ओलांडताना आपण अनेकदा पहिले आहे. अगदी एकमेकांच्या कानशिलात लागवण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका तेलुगू वृत्तवाहिनीवर डिबेट चालू असतानाच शोची अँकर असलेल्या महिलेने चक्क पाहुण्यालाच स्टुडिओमधून बाहेर जाण्यास सांगितले. सोशल मीडियावर या प्रकारची चांगलीच चर्चा रंगली आहे.

लोकप्रिय तेलुगू अभिनेता विश्व सेन सोमवारी त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका वृत्तवाहिनीच्या न्यूजरुममध्ये पोहोचला होता. यावेळी अँकर आणि विश्वक सेन यांच्यात वाद झाला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये टीव्ही अँकर देवी नागवल्ली विश्वक सेनला न्यूज स्टुडिओमधून चक्क हाकलून देत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये, विश्वक सेनचा अँकरने पागल सेन असा उल्लेख केला त्यामुळे तो प्रचंड संतापला. त्याने अँकरला चांगलाच फैलावर घेत वैयक्तिकरित्या माझ्यावर हल्ला करण्याचा तुला कोणताही अधिकार नाही आणि तुझी जीभ ताळ्यावर ठेव आणि मला वेडा किंवा निराश व्यक्ती म्हणू नको, असे सुनावले.

त्यानंतर अँकर देवी नागवल्ली हिने विश्वक सेनला माझ्या स्टुडिओमधून ताबडतोब बाहेर जाण्यास सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल होताच विश्वक सेनेच्या चाहत्यांनी अँकरला सोशल मीडियात चांगलेच फैलावर घेतले. प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा, कौशल इनामदार यांच्या सहित अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत टीव्ही अँकरला सुनावले आहे.

Share This News
error: Content is protected !!