ऊसाचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र ऊसाचा रस प्रमाणापेक्षा जास्त प्याला तर वजन वाढण्याचा धोका असतो. ऊसाच्या रसामुळे वजन वाढण्यामगे ऊसाच्या रसातील कॅलरीज कारणीभूत असतात. ऊसाच्या रसात कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शरीरातील फॅटस वेगानं वाढतात. मात्र ऊसाचा रस प्रमाणात प्याल्यास वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. ऊसाच्या रसाद्वारे शरीराला नैसर्गिक साखर मिळते. ऊसाच्या रसानं शरीरातील बॅड कोलेस्टेराॅल कमी होतं. यामुळे वजन नियंत्रित राहाण्यास, कमी होण्यास ऊसाच्या रसाचा उपयोग होतो.
ऊसाचा रस प्याल्यानं शरीराला थंडावा मिळतो सोबतच ऊसाच्या रसामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. ऊसाच्या रसातील पोषक घटकांचा उपयोग शरीरातील ऊर्जा वाढण्यासाठी होतो. यकृताशी संबंधित समस्या ऊसाच्या रसानं ठीक होतात. ऊसाच्या रसातील गुणधर्मांमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचं संतुलन राखलं जातं.
ऊसाचा रस प्याल्याने रसातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि मॅग्नीज हे पोषक घटक शरीराला मिळतात. ऊसाच्या रसात फ्लेवोनाॅइडस हे ॲण्टिऑक्सिडण्ट कॅन्सरचा धोका कमी करतात. शरीराला दीर्घकाळ ताकद मिळण्यासाठी , स्नायू मजबूत होण्यासाठी कर्बोदकांची गरज असते. ऊसाच्या रसात कर्बोदकांचं प्रमाण जास्त असतं. उन्हाळ्यात व्यायामानंतर शरीरा आर्द्रता निर्माण करण्यास इतर स्पोर्टस ड्रिंकच्या तुलनेत ऊसाचा रस फायदेशीर ठरतो. ऊसाच्या रसात पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्यानं पचन सुधारण्यास,पोटाचं आरोग्य नीट राहाण्यास फायदा होतो.