स्मार्टफोनवरून चेक करा, रस्त्यावरील गोंगाट, लाऊडस्पीकरचा आवाज

468 0

नवी दिल्ली- सध्या राज्यात मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा गाजतोय. मशिदीवर लावलेल्या भोंग्यातून ऐकू येणाऱ्या अजानमुळे नागरिकांना त्रास होतो अशी तक्रार करण्यात येत आहे. मशिदीवरील भोंगे जाऊद्या हो, एरवी रस्त्यावर सुद्धा कर्णकटू हॉर्न, डीजे यांचा आवाज कानाचे पडदे फाडून टाकतो. मग या आवाजाचे डेसिबल आपण मोजायचे कसे ? त्यासाठी तुमचा स्मार्टफोन आहे ना !

यासाठी तुम्हाला काही अॅप्स डाउनलोड करावे लागतील. त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या जवळपास परिसरात किती गोंगाट आहे, हे जाणून घेऊ शकता.

Decibel X
या अॅपला तुम्ही अँड्रॉयड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर यूज करू शकता. गुगल प्ले स्टोरवर हे ४ स्टार रेटिंग सोबत येते. या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला साउंड लेवल मीटर मध्ये बदलू शकता. यात ३० ते १२० डीबी पर्यंत रेंज मोजले जावू शकते. यात तुम्हाला अनेक सारे फीचर्स आणि सहज इंटरफेस मिळते. डीबी म्हणजेच डेसिबल साउंड (आवाज) मोजण्याची यूनिट असते.

SPL Meter
या अॅपला तुम्ही iOS आणि Android प्लॅटफॉर्मवर यूज करू शकतात. गुगल प्ले स्टोरवर या अॅपला ४ हून जास्त स्टार्स रेटिंग मिळाली आहे. हे अॅप तुमच्या स्मार्टफोनच्या मायक्रोफोनच्या मदतीने साउंड लेवलला मेजर करते. तसेच एसपीएल म्हणजेच साउंड प्रेशर लेवल मध्ये कन्वर्ट करते. फोनमध्ये लावलेलेल मायक्रोफोनची क्षमता मर्यादीत असते. त्यामुळे तुम्हाला एक मर्यादीत डेटा मिळेल.

Sound Meter
साउंड मीटर अॅपला तुम्ही अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवर यूज करू शकता. गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असलेले हे अॅप ४.०८ एमबी चे आहे. हे सोप्या यूआय सोबत येते. याच्या मदतीने तुम्ही साउंड लेवल मोजू शकता. हे अॅप तुमच्या स्मार्टफोन मध्ये लावलेल्या मायक्रोफोनचा वापर करते.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide