‘खेडवळ’ लूकमध्ये झळकणार अभिनेत्री स्मिता तांबे

560 0

नवनवीन भूमिकांतून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या कलाकारांपैकी एक अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे. स्मिता आगामी ‘लगन’ या मराठी चित्रपटात आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. या आधी स्मिताने चित्रपट, मालिका, वेब सीरीज या माध्यमांतून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

जी. बी. एंटरटेंन्मेंट निर्मित आणि अर्जुन गुजर दिग्दर्शित ‘लगन’ हा चित्रपट 6 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राधा असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. खेड्यात राहणारी ऊसतोडणी कामगाराची भूमिका स्मिताने या चित्रपटात साकारली आहे. “चित्रपटात ही वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली याचा मला आनंद वाटतो आणि समाधानही वाटते,” अशी प्रतिक्रिया स्मिताने कळवली आहे. दिग्दर्शक अर्जुन गुजर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचे छायांकन सोपान पुरंदरे आणि रणजीत माने यांचे आहे. संगीत पी.शंकरम, विजय गवंडे, रोहित नागभिडे यांचे असून अजय गोगावले, आदर्श शिंदे, चिन्मयी श्रीपाद, ओमकारस्वरूप बागडे, पी.शंकरम यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.

करारी, कणखर तरीही सोज्वळ अशा छटा या व्यक्तिरेखेला आहेत. स्मिता या चित्रपटात खेडवळ लूक दिसणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांतून चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!