आंतरशालेय गोळाफेक स्पर्धेत विभूती मावळे, जयनी पाटील यांची नेत्रदीपक कामगिरी

2392 0

पुणे- बेंगाळे स्पोर्ट अकॅडमीच्यावतीने भोसरी येथे आयोजित केलेल्या आंतरशालेय ऍथलेटिक्स स्पर्धेत विभूती मावळे हिने सुवर्णपदक तर जयंती पाटील हिने रौप्यपदक मिळवून दमदार कामगिरी केली आहे.

विभूती मावळे हिने १० वर्ष वयोगटामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले तर जयनी पाटील हिने १२ वर्षे वयोगटामध्ये रौप्यपदक प्राप्त केले. विभूती ही सेंट मॅथ्यूज अकॅडेमीची विद्यार्थिनी असून ती अक्षय मार्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे तर जयनी पाटील ही माउंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल ची विद्यार्थिनी असून तिला अंकुश घुगे यांच्याकडून प्रशिक्षण दिले जात आहे.

विभूती मावळे आणि जयनी पाटील यांच्या यशाबद्दल त्यांचे शिक्षक, पालक आणि मित्रमंडळींमध्ये कौतुक केले जात आहे.

Share This News
error: Content is protected !!