प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड नंतर आता शेर शिवराज हा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचा आता टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी हा टीझर त्यांच्या सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे. कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारणासाठी तेव्हा कणाकणातुन बाहेर पडला, सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह शेर शिवराज… 22 एप्रिल 2022… हर हर महादेव महाराष्ट्र…’
महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर आजपर्यंत अनेक सुंदर चित्रपट बनले. आता हा नवा चित्रपट 22 एप्रिल ला प्रदर्शित होत आहे.