मुंबई – बाॅलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याने आपल्या नव्या सिनेमाची घोषणा केली होती. आता त्याने या चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे. ‘जवान’ असे या सिनेमाचे नाव असून टिझर पाहिल्यानंतर हा एक थ्रिलिंग सिनेमा असल्याचा अनुभव येतो. मात्र या सिनेमाची तुलना १९९० मधल्या हाॅलिवूडपट डार्कमॅनशी केली जात आहे. याचे कारण म्हणजे जवानच्या टिझरमध्ये दिसणारा शाहरुख खान याचा लूक
हॉलिवूडचा डार्कमॅन १९९० मध्ये रिलीज झाला. त्यामध्ये Liam Neeson याने साकारलेली व्यक्तिरेखा आणि शाहरुख खान याचा जवान सिनेमातील लूक यामध्ये खूप साधर्म्य दिसून येतंय. अनेक फॅन्सनी शाहरुखच्या या बँडेजवाल्या लूकला पाहून त्याची तुलना डार्कमॅन सिनेमातल्या लूकशी केली.
डार्कमॅन सिनेमात Liam Neeson याला जिवंत जाळून मरण्यासाठीसोडलेलं असतं. नंतर आपल्या जळलेल्या खुणांना लपवण्यासाठी तो चेहऱ्यावर पट्ट्या बांधतो. तो पुन्हा परत येतो आणि ज्यांनी हे कुकर्म केलं त्यांचा बदला घेतो. शाहरुख खान याचा नेमका तसाच लूक आहे. पण कथानक तेच आहे का हे पाहण्यासाठी रसिकांना थोडी कळ काढावी लागणार आहे. पण शाहरुख खानचा हा लूक पाहून अनेकांनी विचारलंय जवान हा हाॅलिवूडपट डार्कमॅनचा सीक्वल आहे की रिमेक?