नागपूर – जिल्हा सत्र न्यायालयाच्या कॅन्टीन मध्ये समोसा महाग मिळत असल्यामुळे एका वकिलाने चक्क बार असोसिएशनचा राजीनामा दिला आहे. या अफलातून प्रकारामुळे नागपूर बार असोसिएशन मध्ये खमंग चर्चा रंगली आहे.
धर्मराज बुगाटी असे या वकिलाचे नाव असून बार असोसिएशन कडून चालविल्या जाणाऱ्या कॅन्टीनमध्ये वकिलांना सवलतीच्या दरात समोसा मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र या कॅन्टीन मध्ये समोसा महागात मिळत असल्यामुळे वकिलाने चक्क संघटनेचा राजीनामा दिला.