’रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये अक्षय कुमारसह अनन्या पांडे साकारणार वकिलाची भूमिका

368 0

दिग्दर्शक करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ’रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये अभिनेता अक्षय कुमार झळकणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडे दिसणारा आहे. वकील सी. शंकरन नायर यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे.

सी. शंकरन नायर यांनी 1897 मध्ये अमरावती येथे झालेल्या अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. ते देशातील सर्वात आश्वासक वकिलांपैकी एक होते. सी शंकरन हे मद्रास उच्च न्यायालयात वकील आणि न्यायाधीश होते. त्यांची भूमिका या चित्रपट अक्षय कुमार साकारणार आहे. अक्षय कुमारच्या सम्राट पृथवीराज या चित्रपटाला सध्या चांगलीच पसंती मिळत आहे. त्यात आता त्याच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

अक्षय कुमारच्या चित्रपटांना प्रेक्षक चांगलीच पसंती देतात. अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून अनन्या पांडे सुद्धा वकिलाच्या खास भूमिकेत दिसणार आहे. या बायोपिकला ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर’ असे नाव दिले असल्याची महैती समोर येत आहे. या चित्रपटाची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide