मुंबई- काही दिवसांपूर्वी अभिजित पानसे लिखीत, दिग्दर्शित ‘रानबाजार’ या बिग बजेट वेबसीरिजचे टिझर सोशल मीडियावर झळकले होते. त्यानंतर प्रेक्षकांच्या मनामध्ये या वेबसिरीजची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता ‘रानबाजार’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘रानबाजार’मध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये मराठी अभिनेत्रींचे हॉट सीन पाहून प्रेक्षक वेडापिसा झाला होता. अखेर या वेब सिरींजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पण हा ट्रेलर पाहून नेटकरी नाराज झाले आहेत. या ट्रेलरमध्ये अभिनेत्रींचे बोल्ड सीन पाहायला मिळाले नाही म्हणून निराशा व्यक्त केली आहे.
या वेबसिरीजमध्ये उर्मिला कोठारे, मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, वैभव मांगले, अनंत जोग, सुरेखा कुडची, अभिजित पानसे, गिरीष दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. लिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसीरिजची निर्मिती प्लॅनेट मराठी , अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी , रावण फ्युचर प्रॉडक्शन , अभिजीत पानसे आणि अनिता पालांडे यांनी केली असून ही भव्य वेबसीरिज २० मेपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.