अभिनेता आर माधवनच्या मुलाने पटकावले डॅनिश ओपन जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक

641 0

मुंबई – अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत यानं डेन्मार्क येथील कोपहेगनमध्ये झालेल्या डॅनिश ओपन जलतरण स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. वेदांताच्या यशामुळे भारताची मान उंचावली आहे.

पूर्वी याच स्पर्धेमध्ये वेदांतनं जलतरण स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं होतं. आर. माधवननं यानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वेदांतला सुवर्णपदक देतानाचा व्हिडिओ आणि त्याबरोबर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आर. माधवन यानं लिहिलं आहे की,’सुवर्णपदक. तुम्हा सर्वांनी दिलेल्या भरभरून शुभेच्छा आणि देवाचा आशीर्वाद यामुळे ही विजयी घोडदौड सुरू आहे. आज 800 मीटर जलतरण स्पर्धेमध्ये वेदांतनं सुवर्णपदक पटकावलं आहे. त्याच्या या यशासाठी त्याचे कोच प्रदीप सर, स्विमिंग फेडरेशनच आणि संपूर्ण टीमचं खूप आभार…’

यापूर्वी वेदांत याने बेंगळुरू येथे मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या ज्युनियर नॅशनल एक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये 4 रौप्य आणि 3 कांस्य पदके जिकली होती. वेदांतने 800 मीटर फ्री स्टाईल पोहणे, 1500 मीटर फ्री स्टाईल पोहणे, 4×100 फ्री स्टाईल रिले आणि 4×200 फ्री स्टाईल रिले इव्हेंटमध्ये भाग घेतला आणि रौप्य पदक जिंकले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!