मुंबई- साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या हिंदी चित्रपटाची खूप चर्चा सुरु आहे. हा चित्रपट रसिकांसाठी कधी रिलीज होणार याची उत्सुकता आहे.
दिवाळीच्या आसपास हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रभास हळूहळू बॉलिवूडमध्येही आपली पकड मजबूत करत आहे. ‘बाहुबली’ नंतर प्रभासला बॉलिवूडमध्ये देखील मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड चित्रपट निर्माते ते स्टार्स त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत.
काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खानने त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीज करण्याची घोषणा केली होती. या चित्रपटाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आणि ही तारीख सोडल्याबद्दल आमिरने निर्माते भूषण कुमार, प्रभास आणि त्याच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. मात्र, रामायणावर आधारित हा चित्रपट कधी रिलीज होणार याबाबत उत्सुकता आहे.
2022 च्या दिवाळी वीकेंडमध्ये हा चित्रपट रिलीज होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ‘पिंकविला’शी झालेल्या संवादात भूषण कुमार यांना ‘आदिपुरुष’ चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होण्याबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ‘आम्ही अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केलेली नाही. एकदा आम्ही ठरवले की आम्ही ते जाहीर करू. दिवाळीच्या वीकेंडसाठी अनेक चित्रपटांची घोषणा आधीच झाली आहे. म्हणून आम्ही एक खास तारीख शोधत आहोत’