नवी दिल्ली- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी 8.1% व्याज दर निश्चित केला आहे. पीएफचे व्याज लवकरच खात्यात येईल या आशेवर बहुतेक लोक आहेत. दुसरीकडे, मीडिया रिपोर्ट्सनुसार, EPFO जूनपर्यंत पीएफ खात्यावरील व्याजाची रक्कम ट्रान्सफर करू शकते. यामध्ये अनेक वेळा खातेदारांना आपल्या पीएफ खात्यातील शिल्लक कशी माहित करून घेता येईल याची चिंता असते.
तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही इंटरनेटशिवायही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकता. EPFO आपल्या खातेदारांना सर्व प्रकारच्या सुविधा देते. या सुविधेअंतर्गत तुम्ही इंटरनेटशिवाय तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक देखील तपासू शकता. पीएफ खात्यातील शिल्लक झटपट तपासण्याची ही पद्धत जाणून घेऊया.
मिस्ड कॉल देऊन बॅलन्स तपासा
EPFO आपल्या ग्राहकांना मिस्ड कॉल करून पीएफ खात्यातील शिल्लक सहजपणे तपासण्याची परवानगी देते. यासाठी खातेदाराला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. असे केल्यानंतर काही वेळातच तुमच्या खात्याशी संबंधित माहिती स्मार्टफोनवरील मेसेजमध्ये आढळते.