पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजप नेत्या नुपूर शर्मा यांना भाजपमधून निलंबित करण्यात आलं होतं. अशा वक्तव्यामुळे चर्चेत आल्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी येत असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर सांगितली होती. या प्रकरणी आता स्पष्ट मत मांडणारी अभिनेत्री कंगना रणौत हिने भाजप नेत्या नुपूर शर्माचं समर्थन केलं आहे.
प्रत्येकाला आपले स्पष्ट मत मांडण्याचा हक्क आहे त्याप्रमाणे नुपूरला देखील आहे. पण दुर्दैवाने त्यांना धमकावले जात आहे. धमकवणाऱ्यांनी स्वतः ला डॉन समजू नये. आपल्या देशात लोकशाही आहे. जे कोणी विसरले त्यांना आठवण करून देते की आपल्या देशात सरकार आहे. हा देश अफगाणिस्तान नाहीये. असे परखड मत कंगनाने मांडलं आहे.
भाजपकडून शर्माला निलंबित केल्याने त्यांना एक पत्र पाठवण्यात आला होतं. या पत्रात भाजप अशा टिप्पणीचं समर्थन करत नाही आणि हे भाजपच्या कल्पनेच्या विरोधात आहे, असे स्पष्ट लिहिले होते. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा विरोध होत असून आता कंगनाने तिचे समर्थन करण्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.