पुण्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छ्ता मोहीम

378 0

पुणे- डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने महापालिकेच्या सहकार्याने शहरातील ६० झोपडपट्ट्यांमध्ये रविवारी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत साडेआठ किलोमीटरचा परिसर स्वच्छ करून १९२ टन कचऱ्याचं संकलन करण्यात आलं आहे.

कोथरूड, केळेवाडी मधील मोगल चौक ते एआरएआय कंपनी गेट, किष्किंधानगर, सुतारदरा मैदान, पर्वती टेकडी, पर्वती जनता वसाहत, चुनाभट्टी कॉर्नर, गोसावी वस्ती, वारजे, कर्वेनगर, जलशुद्धीकरण प्रकल्प, होम कॉलनी, वडारवाडी, खानवस्ती रोड, रामनगर, येरवडा, कळस, धानोरी येथील स्वीपर चाळ, भैयावाडी, मदारवस्ती, धनकवडी, राऊतबाग, कात्रज नवीन वसाहत, कात्रजतलाव, गुगळे प्लॉट आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.

शहरातील विविध ठिकाणच्या ६० झोपडपट्ट्यामधील साडे आठ किलोमीटर परिसरात ४ हजार ४५४ स्वयंसेवकांमार्फत कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. संकलित कचऱ्याच्या वाहतुकीसाठी महापालिकेकडून कचरा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!