नाना पाटेकर प्रथमच दिसणार वेबसीरिजमध्ये

464 0

मुंबई- दिग्दर्शक प्रकाश झा नेहमीच राजकीय आणि सामाजिक विषयांवरील चित्रपट सादर करताना दिसतात. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आश्रम’ वेबसीरीजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता प्रकाश झा नवीन वेब सिरीज घेऊन येणार आहेत. या वेब सिरीजमध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘लालबत्ती’ असं या वेब सीरिजचे नाव आहे. या सीरीजच्या माध्यमातून नाना वेब सिरीजमध्ये प्रथमच दिसणार आहेत. नाना पाटेकर राजकारण्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रकाश झा आणि नाना पाटेकर या जोडीनं यापूर्वी ‘अपहरण’, ‘राजनिती’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे ही जोडी आता ओटीटीवर काय कमाल करते, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Share This News
error: Content is protected !!