बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली होती. अभिनेता हृतिक रोशन आता आगामी चित्रपट ‘फायटर’ मध्ये झळकणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण ही मुख्य भूमिका साकारणार आहे.
फायटर हा ॲक्शन मूवी असून त्यात स्टंटबाजी देखील करावी लागणार आहे. या चित्रपटासाठी हृतिक मार्शल आर्टचं ट्रेनिंग घेत आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी सर्व प्रकारची मेहनत तो घेत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झाले नाही. पुढच्या महिन्यात चित्रीकरणाला सुरुवात होईल असे संकेत येत आहे. हृतिकने ‘बँग बँग’ आणि ‘वॉर’ नंतर विक्रम वेधा मध्ये काम केलं, आता फायटर चित्रपटासाठी तो तयारी करत आहे. त्याच्यासोबत दीपिका पदुकोण दिसणार असून या चित्रपटाच्या तयारीला ती ही लागणार आहे. विक्रम वेधा या चित्रपटाची आतुरतेने चाहते वाट पाहत आहे तेच हृतिकच्या आगामी चित्रपट ची घोषणा झाली हे.