मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातील फोटो व्हायरल, काय आहे फोटोमागील सत्य ?

493 0

बंगळुरू- बॉलिवूडचे डिस्को डान्सर म्हणून ज्यांची ओळख आहे असे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णलयात दाखल करण्यात आल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे आता सगळीकडे मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीसंदर्भात अफवा पसरली आहे.

मिथुन चक्रवर्तींचे चाहते सध्या खूप चिंतेमध्ये आहेत. कारण मिथुन चक्रवर्तींचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. मिथुन हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेले या फोटोमध्ये दिसतात. मिथुन यांना अशा अवस्थेत पाहून चाहत खूप दुखावले आहेत. मात्र या फोटोमुळे आता सगळीकडे मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीसंदर्भात अफवा पसरली आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा फोटो शेअर केला गेला आहे.

याबाबत मिथुन यांचे पुत्र मिमोह चक्रवर्ती यांनी नुकतीच त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. त्यानं सांगितलं आहे,”मिथुन चक्रवर्ती यांना किडनी स्टोनचा त्रास उद्भवल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. व्हायरल झालेला फोटो हा रुग्णालयातला आहे,ज्यामध्ये मिथुन चक्रवर्ती बेशुद्धावस्थेत बेडवर झोपलेले आहेत. पण आता मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती स्थिर आहे”, असंही मिमोह चक्रवर्तीनं नमूद केलं आहे. ”बंगळुरुमधील रुग्णालयातून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. ते फीट आहेत”, असंही मिमोहनं म्हटलं आहे.

सर्वच जण आता अभिनेत्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. भाजपचे राष्ट्रीय सचिव डॉ. अनुपण हजरा यांनीही मिथुन चक्रवर्ती यांचे फोटो शेअर करत ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या द काश्मीर फाइल्स या सिनेमात मिथुन चक्रवर्ती यांचा अभिनय पाहायला मिळाला होता. भाजपचे राष्ट्रीय सचिव डॉ. अनुपण हजरा यांनीही मिथुन चक्रवर्ती यांचे फोटो शेअर करत ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!