KOLHAPURI CHAPPAL VS PRADA SHOES : देशात कोल्हापूर आणि कोल्हापुरी यांचा एक वेगळाच रुबाब आहे. पायात कोल्हापुरी चप्पल घालणं हा महाराष्ट्रातील सगळ्यांसाठीच जिव्हाळ्याचा विषय.. कोल्हापुरी चप्पल म्हणजे आपला रियल ब्रँड.. मात्र हीच कोल्हापुरी चप्पल सध्या जागतिक स्तरावर वादाचा मुद्दा बनली आहे. कारण आहे महागड्या वस्तू बनवणाऱ्या एका विदेशी ब्रँडनं चक्क कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल स्वतःचा ब्रँड म्हणून (KOLHAPURI CHAPPAL VS PRADA SHOES) लॉन्च केली आहे. त्यामुळे आता हा अस्तित्वाचा मुद्दा बनलाय..
ROHTAK DISTRICT NEWS: पत्नीने पोलिस प्रियकरासोबत अश्लील व्हिडिओ पाठवल्यावर पतीची आत्महत्या
इटलीच्या मिलान येथे नवीन ब्रॅण्डेड कपडे, चपला आणि ॲक्सेसरीज यांचे प्रमोशन करणारा फॅशन शो सुरू होता. वेस्टर्न कपडे घालून रॅम्पवरून चालणाऱ्या मॉडेल्सच्या पायातील आकर्षक चपलांनी मात्र सगळ्यांचच लक्ष वेधलं. या मॉडेल्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. विदेशी लोकांसाठी नवल वाटेल असंच डिझाईन या चपलांचं होतं. मात्र भारतीयांना आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना याचं नवल वाटलं नाही, उलट राग जास्त आला. कारण होतं मॉडेल्सच्या पायातील या चप्पल हुबेहूब आपल्या परंपरागत चालत आलेल्या कोल्हापुरी चपलेसारख्या.. “प्राडा” या लक्झरी प्रॉडक्ट बनवणाऱ्या ब्रँडनं बनावट आणि डिझाईन हुबेहूब कोल्हापुरी चपले सारखी असणारी चप्पल लॉन्च केली आहे. ज्याची किंमत सव्वा लाखांपेक्षा जास्त आहे. विदेशी लोकांसाठी की चप्पल आकर्षणाचा भाग ठरली असून किंमत इतकी जास्त असतानाही चप्पल घेण्याकडे अनेकांचा कल आहे. मात्र प्राडा या इंटरनॅशनल ब्रँड ने चक्क महाराष्ट्राचे आणि कोल्हापूरची संस्कृती आणि ओळख असणारी चप्पल चोरावी ? (KOLHAPURI CHAPPAL VS PRADA SHOES) हे नवलच म्हणावं लागेल. कोल्हापुरी चपलेला तेराव्या शतकापासूनचा इतिहास आहे. आधी ही चप्पल मराठा योद्धे घालायचे नंतर ती हळूहळू सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली.
उष्णतेत ही चप्पल पायांना थंडावा देते तर थंडीतही आरामदायक असते. ही चप्पल पूर्णपणे हाताने बनवलेली असल्यामुळे प्रत्येक चप्पल एकमेकांपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असते. ही एक चप्पल बनवण्यासाठी चार ते पाच दिवसांचा वेळ लागतो. त्यामुळेच या चपलेला 2019 साली भारत सरकारच्या पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क महानियंत्रक कार्यालयाने ‘जीआय’ टॅग दिला होता. याचा अर्थ या चपलांची विशिष्टता आणि पारंपरिकता फक्त काही ठरावीक भौगोलिक भागांशी संबंधित आहे. मात्र असं असूनही प्राडाने परस्पर चप्पल चोरली ही आणि याचं कोणतंही क्रेडिट कोल्हापूरकरांना देण्यात आलं नाही. कोल्हापूरात अस्सल कोल्हापूरी चप्पल उत्पादन करणारे हजारो व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे कोल्हापुरी, कापशी, कुरुंदवाडी, धनगरी, रुबाबदार शाहू कोल्हापुरी चप्पल हस्तकलेच्या माध्यमातून बनवल्या जातात. चपला बनवणाऱ्या हजारो कामगारांचं पोट याच व्यवसायावर सुरू आहे. यातही अगदी पाचशे रुपयांपासून ते 35- 40 हजार रुपयांपर्यंतच्या चपला उपलब्ध आहेत. मात्र याच चपला चोरून त्या प्राडा कंपनीकडून दीड लाखात विकल्या जात आहेत.
TOP NEWS MARATHI : RAJ THACKERY & UDDHAV THACKERAY : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यामागची गोष्ट
याचा थेट परिणाम पारंपारिक कोल्हापुरी चपलांवर आणि व्यापारी- कामगारांवर होत आहे. चप्पल बनवणाऱ्या कारागिरांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळेच या सगळ्यांच्या विरोधात स्वतः कोल्हापूर संस्थानचे युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी आवाज उठवला आहे. याविषयी त्यांनी सविस्तर पोस्ट करत हा सर्व “सांस्कृतिक अपहार” आहे, असा आरोप केला आहे. दुसरीकडे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनीही या विरोधात आवाज उठवला असून प्राडा कंपनीने या शब्दांना कोल्हापुरी चप्पल असंच नाव द्यावं अशी मागणी केली आहे.