Expensive Number Plate : अनेकांना भलतेच शौक असतात.
कुणाला भारी बंगले तर कुणाला भारी भारी गाड्या तर कुणाला उंची कपडे, दागिने यांची हौस असते.
मात्र एका व्यक्तीचा VIP नंबर प्लेटचा शौक चांगलाच चर्चेत आला आहे.
1 लाखाच्या स्कुटीसाठी तब्बल 14 लाखांची VIP नंबरप्लेट एका पाठ्ठ्याने घेतलीये…
आता हे प्रकरण हिमाचल प्रदेशातल्या हमीरपुर येथील आहे.
तब्बल 14 लाख रुपये देऊन VIP नंबर प्लेट बसवून घेतलेला हा नंबर आहे (HP21C-0001) याच नंबर साठी संजीव कुमार या पठ्ठ्याने तब्बल 14 लाख (Expensive Number Plate ) रुपये मोजले आहेत.
खरंतर वाहतूक विभाग व्हीआयपी नंबर साठी बोली लावतो.
यासाठी ऑनलाईन पद्धतीने बोली लावल्या जातात. हा नंबर देखील वाहतूक विभागाच्या ऑनलाईन बोली प्रक्रिया अंतर्गत मिळवण्यात आला होता.
यामध्ये फक्त दोन जणांनी भाग घेतला होता. या बोली मध्ये सोलन जिल्ह्यात राहणाऱ्या एका व्यक्तीने साडेतेरा लाख रुपयांची बोली लावली होती.
पण संजीव कुमार यांच्या बोलीनं त्यांना मागे टाकलं आणि (HP21C-0001) हा नंबर 14 लाख रुपयांना (Expensive Number Plate) विकत घेतला.
14 लाखांची ही रक्कम हिमाचल सरकारच्या खात्यात महसूल म्हणून जमा करण्यात आली आहे
त्यामुळे सरकारला कोणत्याही अतिरिक्त संसाधनाशिवाय 14 लाखांचे उत्पन्न मिळालंय…
वाहतूक विभागाच्या मते हा आतापर्यंतचा सर्वात महागडा दुचाकी क्रमांक असू शकतो संजीव कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की
मला विशेष आणि अद्वितीय क्रमांकाची आवड आहे.
हा क्रमांक माझ्या नवीन स्कुटी साठी खरेदी केला आहे.
संजीव कुमार यांच्या निर्णयाची संपूर्ण परिसरामध्ये चर्चा होत आहे.
*TOP NEWS MARATHI : शंखनादात संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं स्वागत
यापूर्वी एप्रिलमध्ये केरळ मधून अशाच प्रकारचे प्रकरण समोर आलं होतं
ज्यामध्ये कोची येथील RTO न लिलावामध्ये ‘0007’ हा क्रमांक सुमारे 46 लाख रुपयांना विकला.
एका सॉफ्टवेअर कंपनीने त्याच्या लक्झरीस कार साठी हा क्रमांक खरेदी केला.
या कारची किंमत चार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे
आणि लिलावानंतर या कारला ‘KL07DG0007’ असा क्रमांक मिळाला.
एक क्रमांक, एक ओळख! संजीव कुमार यांचा ‘HP21C-0001’ हा क्रमांक केवळ एका स्कूटीचा नाही,
तर त्यांच्या युनिक स्टाईलचा परिचय आहे. ही बोली केवळ
वाहन क्रमांकासाठी नाही, तर ‘ओळख’ जपण्याची किंमतही दर्शवते.