मनपसंत मोबाईल, क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास त्यावर अतिरिक्त सूट मिळत असल्याने अनेकजण क्रेडिट कार्डावर खरेदी करतात. पण क्रेडिट कार्ड वापरणे खरोखरीच फायद्याचे आहे का ? त्याचे तोटे काय असतात याबद्दल आधी जाणून घेणे गरजेचे आहे.
क्रेडिट कार्डचा वापर
क्रेडिट कार्डद्वारे बँक किंवा ‘एनबीएफसी’ तुम्हाला अल्पकालावधीसाठी कर्ज देतात. तुमच्या उत्पन्नावर बँका क्रेडिट कार्डची लिमिट ठरवतात. म्हणजेच तुम्हाला एका मर्यादेपर्यंतच खरेदी करावी लागते. खर्च केल्यानंतर महिन्याकाठी बिल येतं. वेळेवर बिल भरल्यास कोणतंही व्याज लागत नाही. मर्यादित शॉपिंगवर कंपन्या वार्षिक शुल्क माफ करतात. आयुष्यभर मोफत अशी कोणतीही सुविधा क्रेडिट कार्डमध्ये नसते. खर्च केल्यानंतर परतफेड ही करावीच लागते. अटी आणि शर्तींवरच कार्डचे शुल्क देखील माफ होते.
क्रेडिट कार्डचे फायदे तोटे
आता आपण क्रेडिट कार्डचे फायदे तोटे पाहुयात शेवटच्या तारखेपर्यंत पैसे न भरल्यास कंपन्या मोठ्या व्याज दरानं वसुली करतात. व्याजाचा दर हा सरासरी 24 ते 40 टक्क्यांपर्यंत असतो. क्रेडिट कार्डमध्ये आणखीन एक मोठा पेच आहे, तो म्हणजे मिनिमम पेमेंटचा, शेवटच्या तारखेला तुम्ही फक्त मिनिमम पेमेंट केल्यास सीबील स्कोअर खराब होणार नाही. मात्र, मुळात व्याजाची रक्कम मिनिमम पेमेंटमधून वसूल करण्यात येत असल्यानं तुमचं मूळ बिल कायम राहतं. त्यामुळे पुढील महिन्यात संपूर्ण बिल येतं. इंधनाच्या किंमती वाढल्यानं प्रवास महागलाय. महागाईचा प्रभाव कमी करण्यात क्रेडिट कार्डचा वापर उपयोगी ठरू शकतो. क्रेडिट कार्डमुळे विमान प्रवासाच्या तिकीटात सूट, इंधनाच्या सरचार्जमध्ये सूट, एअरपोर्ट लाऊंज एक्सेस, हॉटेलच्या भाड्यात सूट आणि फ्री वाहतूक विमा यासारख्या सुविधा मिळतात. एअर माईल्स किंवा ट्रॅव्हल माईल्समुळे विमानाचं तिकिट बुकिंग करताना सूट मिळते.
क्रेडिट कार्ड वापराबद्दलच्या टिप्स
वेळोवेळी तुमची क्रेडिट लिमिट चेक करा, 40 टक्के क्रेडिट लिमिट पार केल्यानंतर क्रेडिट कार्डचा वापर कमी करा. आपत्तकालिन परिस्थितीत क्रेडिट कार्डचा वापर करता यावा यासाठी 40 टक्के क्रेडिट लिमिटची मर्यादा ओलांडू नका, खरेदीचं नियोजन करा आणि त्यानुसारच कार्डचा वापर करा. क्रेडिट कार्डचं पेमेंट भरताना दिरंगाई करू नका अन्यथा मोठा दंड सोसावा लागतो. आता तुम्हाला मुत्थुकृष्णन यांचं म्हणणं पटलंच असेल. ज्यांच्या खात्यात भरपूर पैसा आहे त्यांना क्रेडिट म्हणजेच कर्जाची गरज नसते. अशा व्यक्ती क्रेडिट कार्डचा वापर करून डिस्काऊंट आणि ऑफर्सचा फायदा घेतात . तसेच त्यांच्या खात्यात भरपूर पैसा असल्यानं वेळच्यावेळी क्रेडिट कार्डचं बिलही चुकवतात.
म्हणजेच क्रेडिटकार्ड ही एक चांगली सुविधा आहे. मात्र वेळच्यावेळी क्रेडिट कार्डावर खरेदी केलेल्या रकमेची परतफेड न केल्यास हेच क्रेडिटकार्ड तुमचा खिसा रिकामा करते.