लिंबाची जागा घेतली लसणाने, सोशल मीडियावर लिंबाच्या किमतीबाबत मिम्स

497 0

एप्रिल महिना सुरू असून देशात उष्मा झपाट्याने पडू लागला आहे. उन्हाळ्यात लोकांच्या घरात सर्वात जास्त वापरली जाणारी एक गोष्ट म्हणजे लिंबू. मात्र, देशात लिंबाचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईमुळे लिंबू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर लिंबाच्या किमतीबाबत जोरदार मिम्स बनवले जात आहेत. या उन्हाळ्यात लिंबाच्या किमतींमुळे लोकांची वाईट अवस्था झाली असली तरी सोशल मीडिया वापरकर्ते त्याचे विनोद शेअर करत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल. वाईट नजर दूर ठेवण्यासाठी लोक त्यांच्या दुकानात आणि घरांमध्ये लिंबूसह मिरची लटकवतात. त्यामुळे दुकान आणि घरावर लोकांची काळी नजर लागत नाही असा लोकांचा समज असतो. मात्र या फोटोत लिंबाची जागा लसणाने घेतली आहे.

https://twitter.com/rupin1992/status/1514671347435126789

हा मजेदार फोटो आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यासोबतच त्याने एक मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर लिंबू नसताना लसूणला प्रतिनियुक्तीवर टाकण्यात आले. लसणीने आज पदभार स्वीकारला. लोक पोस्टवर मजेशीर कमेंटही करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!