JioPhone Next फक्त २१६ रुपयात घेऊन जा घरी

242 0

नवी दिल्ली : Reliance Jio ने सादर केलेला ioPhone Next घरी घेऊन जाण्यासाठी आता फक्त २१६ रुपये द्यावे लागणार आहेत. बाकी पैसे ईएमआय द्वारे भरू शकता. हा फोन तुम्ही ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. काय आहेत JioPhone Next स्मार्टफोनवरील ऑफर्स

Reliance Jio ने गेल्यावर्षी JioPhone Next ला लाँच केले होते. मात्र या फोनची किंमत समोर आल्यानंतर यूजर्सची निराशा झाली होती. Jio ने फोनला खरेदीसाठी वेगवेगळे ईएमआय पर्याय दिले होते. मात्र, ईएमआयवर खरेदी केल्यावर फोनची किंमत १४ हजार रुपयांच्या पुढे जाते.

JioPhone Next सध्या ई-कॉमर्स साइट Amazon India वर फक्त ४५९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फोनला कंपनीने ६,४९९ रुपये किंमतीत लाँच केले होते. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहक या फोनला फक्त ४,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकतात. यासाठी यूजर्सला जूना फोन देऊन एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यावा लागेल. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. फोनला खरेदी करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. कारण आता फोन ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे.

JioPhone Next चे फीचर्स

लक्षात घ्या की JioPhone Next कॅरियर-लॉकसह येतो. याचा अर्थ फोनमध्ये तुम्ही दुसऱ्या कंपनीचे सिम कार्ड वापरू शकत नाही. यात केवळ जिओचे सिम कार्ड काम करेल. JioPhone नेक्स्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१५ SoC सह येतो. यात २ जीबीपर्यंत रॅम आणि ३२ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा फोन Pragati OS वर काम करतो. या ओएसला खासकरून भारतीय यूजर्ससाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी ३५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. तर सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Share This News

Related Post

सायंकाळी 7 वाजता लग्नानंतर रणबीर-आलिया प्रसारमाध्यमांसमोर येणार

Posted by - April 14, 2022 0
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गुरुवारी संध्याकाळी 7  च्या सुमारास मीडियासमोर येणार आहेत. लग्नाची वेळ दुपारी 2 वाजताची आहे. आलिया…

चहा पिण्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत अनेक खास ठिकाण शोधली असतील…! पण असा चहाप्रेमी नक्कीच पाहिला नसेल; हा व्हिडिओ पाहून नक्की म्हणाल, वाह चाय !

Posted by - January 2, 2023 0
चहाप्रेमी वेगवेगळ्या चहाच्या टपऱ्या, चहाचे खास ठिकाण किंवा एखादं खास हॉटेल देखील शोधून काढतात. चहाप्रेमी अगदी केव्हाही, कुठेही चहा पिण्यासाठी…
RASHIBHAVISHY

Today’s Horoscope : मीन राशीसाठी आजचा दिवस जवळच्या लोकांचे खरे चेहरे दाखवणारा; वाचा तुमचे राशिभविष्य

Posted by - November 15, 2022 0
मेष रास : मेष राशीसाठी आजचा दिवस जीवनाच्या जोडीदारासाठी विशेष आहे आज जोडीदारासोबत विशेष दिवस व्यतीत कराल. एखादी घटना तुमच्या…

नंदादीप म्हणजे काय ? नवरात्रीमध्ये का लावला जातो देवाजवळ अखंड दिवा ; वाचा महत्व आणि कारण

Posted by - September 28, 2022 0
  खाद्यतेलाचा विशेषकरुन तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा तेज तत्त्वाचं प्रतिनिधित्व करतो. नवरात्रीच्या काळात आणि इतर सणाच्या काळात वातावरणात तेज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *