जान्हवी कपूरचा हिरव्या साडीतील हॉट लूक पाहून तुम्ही सुद्धा व्हाल घायाळ

505 0

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिने सध्या सोशल मीडियावर कल्ला केला आहे. अलीकडेच तिने साडी परिधान केलेले आकर्षक फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. चाहते हे फोटो पाहून घायाळ झाले आहेत.

अगदी काही वेळातच जान्हवी कपूरचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिने परिधान केलेल्या साडीवर सफेद, लाइट ग्रीन आणि बेबी पिंक कलरची प्लोरल प्रिंट आहे. ज्यावर गोल्डन सिक्वेंस आणि बीड्सशी जोडलं गेलं आहे. यामुळेच साडीवर हल्का ब्लिंग इफेक्ट क्रिएट होत आहे. महत्वाचं म्हणजे ही साडी नाइट फंक्शनकरता देखील कॅरी करू शकतात. या साडीला अगदी बारिक पिवळ्या रंगाची पायपिंग केली आहे. यामुळे साडीला एक वेगळाच फिनिशिंच टच मिळाला आहे. डिझाइनरच्या ऑफिशिअल वेबसाइटवर या ग्रीन साडीची किंमत ७० हजार रुपये आहे.

साडीसोबत जान्हवीने डीप V नेकलाइनचा मॅचिंग ब्लाऊज घातलाय. जो फ्रंटने टाइट फिटिंग असून मागच्या बाजूस बॅकलेस आहे. जान्हवी या साडीत खूप सुंदर दिसत आहे. जान्हवीने कानात गुलाबी रंगाचे स्टोन्स असलेले गोल्डन झुमके आणि एमराल्ड रिंग घातली आहे. फॅशन डिझाइनर अनीता डोंगरेच्या कलेक्शनमधून जान्हवीने ही साडी निवडली आहे. ही साडी बनवण्यासाठी वेगन फॅब्रिक्सचा वापर केला आहे. महत्वाचं म्हणजे हे फॅब्रिक इको फ्रेंडली आणि लाइट वेट आहे. जान्हवीने या साडीकरता मॅचिंग ब्लाऊजची निवड केली आहे. जान्हवीच्या या पोस्टवर तिचे वडील बोनी कपूर यांनी ‘अति सुंदर’ अशी कमेंट केली आहे.

 

 

Share This News
error: Content is protected !!