ईडीची नजर बॉलिवूडवर ! अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटींची संपत्ती जप्त

546 0

मुंबई – बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिची तब्बल सव्वा सात कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. या घटनेने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. ईडीने 7 कोटी रुपयांच्या भेटवस्तू आणि मालमत्ता जप्त केल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात ईडीने जॅकलिनची 7 कोटी 27 लाख रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने 7 कोटी रुपयांच्या भेटवस्तू आणि मालमत्ता जप्त केल्या आहेत. भेटीपोटी मिळालेल्या वस्तू या गुन्ह्यातून मिळालेल्या होत्या. या भेटवस्तू आणि मालमत्ता सुकेश चंद्रशेखर यांनी दिल्या होत्या, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

ईडीने तपासादरम्यान जॅकलिनचे जबाब नोंदवले होते. त्याचवेळी जॅकलिनने ईडीला सांगितलं होतं की सुकेशने माझ्या कुटुंबातील सदस्यांना आणि मला लाखो रुपयांच्या घोड्यासह महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याशिवाय सुकेशने जॅकलिनच्या आलिशान हॉटेल्समध्ये राहण्याचा खर्चही उचलला होता. जॅकलिन आणि सुकेशचे अनेक फोटोही समोर आले होते. सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे.

सुकेश चंद्रशेखर याच्याकडून जॅकलिनला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला हिऱ्याची अंगठी देऊन प्रपोज केले होते. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केल्यानंतर तिला सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्याचे आढळून आले. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचेही बोलले जात आहे. सुकेश चंद्रशेकरने जॅकलीन फर्नांडिसला प्रपोज करुन हिऱ्याची अंगठी दिल्याचे ताज्या अहवालातून समोर आले आहे. या हिऱ्याच्या अंगठीवर J आणि S ही अक्षरे होती.

Share This News
error: Content is protected !!