Yam Deep Daan Dhantrayodashi 2025: Why is the Yam Deep lit on Dhantrayodashi? How to light the Yam Deep?

Yam Deep Daan Dhantrayodashi 2025: धनत्रयोदाशीला यम दीप का लावतात ? कसा लावावा हा यम दीप ?

409 0

Yam Deep Daan Dhantrayodashi 2025: आज १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी भगवान धन्वंतरी यांची विशेष पूजा केली जाते. यासोबतच माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि कुबेर यांचीही पूजा करण्याची (Yam Deep Daan Dhantrayodashi 2025) प्रथा आहे. या दिवशी एक खास दिवा लावण्याची पद्धत आहे, तो म्हणजे ‘यमाचा दिवा’. हा दिवा मृत्युचे देवता यमराज यांच्यासाठी लावला जातो. पद्मपुराण आणि स्कंद पुराणातही याचा उल्लेख आढळतो. असा विश्वास आहे की, धनत्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात (संध्याकाळच्या वेळी) हा दिवा लावल्याने अकाली मृत्यूचे भय टळते.

यमाचा दिवा कसा लावावा?

१. मातीचा दिवा:

* चार तोंडे असलेला मातीचा मोठा दिवा घ्यावा.
* हा दिवा काही तास पाण्यात भिजवावा, जेणेकरून तो जास्त वेळ तेवत राहील.
* दिवा वाळल्यावर त्याच्या चारही टोकांना वाती लावाव्यात.
* दिव्यात मोहरीचे तेल घालावे.
* प्रदोष काळाच्या वेळी हा दिवा लावावा आणि तो दक्षिणेकडे (दक्षिण दिशा) तोंड करून ठेवावा.
* दिवा लावताना यम दीपदान मंत्राचा जप करावा.

२. कणकेचा (पिठाचा) दिवा:

* मातीच्या दिव्याऐवजी कणकेचा चार तोंडे असलेला दिवा तयार करता येतो.
* यात मोहरीचे तेल घालून दोन किंवा चार वाती लावाव्यात.
* दिवा लावून त्याची हळद-कुंकू, अक्षता आणि फुलांनी पूजा करावी.
* हा दिवा सुद्धा दक्षिण दिशेला ठेवावा.

शुभ मुहूर्त

यम दीपदान करण्याचा शुभ काळ संध्याकाळचा असतो. आज संध्याकाळी ५ वाजून ४८ मिनिटांपासून रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत हा दिवा लावणे शुभ मानले जाते. या शुभ वेळेत दीपदान केल्यास जीवनातील (Yam Deep Daan Dhantrayodashi 2025) अनेक अडचणी दूर होतात. तसेच, ज्या घरात हे दीपदान केले जाते, त्या घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य, दीर्घायुष्य, आनंद आणि समृद्धी वाढते, अशी श्रद्धा आहे.

यम दीपदानासाठी खालील मंत्राचा जप करावा:
* मृत्युना पाशहस्तेन कळेन भर्य साहा ।
* त्रयोदशी दीपदानात सूर्यजः प्रेयतामिठी ।
जर कोणाला हा मंत्र म्हणायचा नसेल, तर त्यांनी केवळ हात जोडून यमराजाला प्रार्थना केली तरी चालते.

Share This News
error: Content is protected !!