उन्हाळ्यात आहार कसा असावा? जाणून घ्या

157 0

उन्हाळ्यात थंडावा मिळावा म्हणून लोकांना काय खावे हा प्रश्न पडतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्यात पचन संबंधित आजार उद्धभू नये म्हणून हलके अन्न खाणे, जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात चरबीयुक्त आणि तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. आणखी काही पदार्थ आहेत ज्यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात उन्हाळ्यात करू शकतात. उन्हाळ्यात आपला आहार कसा असावा हे जाणून घ्या.

उन्हाळ्यात नारळपाणी पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते. तसेच पोटातील आम्लाची पातळी कमी होते. शरीराला थंडावा मिळण्यासाठी दही खाणे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. दह्यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते. दही खाणे आणि ताक पिणे उत्तमच आहे. उन्हाळ्यात कलिंगड, खरबूज, स्ट्रॉबेरी आणि पीच ही फळे खाल्याने शरीरातील उष्णता कमी होते. काकडी खाणे देखील उन्हाळ्यात उपयोगी ठरते. उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्यावे. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पिणे आवश्यक आहे. तसेच कोकम सरबत, लिंबू सरबत, उसाचा रस, फळाचा रस, लस्सी असे पेय प्यावे.

नाचणीची आंबील, कैरीचे पन्हं, आहारात हिरव्या भाज्या, ज्वारी, नाचणी, कडधान्ये, वरणभात तसेच दूध, तूप, दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यास उन्हाळ्यात आरोग्य स्वस्थ राहील.

Share This News
error: Content is protected !!