महाराष्ट्रात नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत फलटण विधानसभा मतदारसंघात दीपक चव्हाण यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं दीपक चव्हाण हे माजी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय मानले जातात.
अजित पवारांसोबत सुरुवातीला राहणाऱ्या दीपक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला व त्यांना उमेदवारी देखील मिळाले मात्र राष्ट्रवादीच्या सचिन पाटील यांनी दीपक चव्हाण यांचा पराभव केला.
यानंतर आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाट्सअप स्टेटस ठेवत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
रामराजे नाईक निंबाळकरांच्या व्हाट्सअप स्टेटस काय?
झालेल्या चुका मान्य करून नव्या संघर्षाला सुरुवात, सुरक्षित आधुनिक संपन्न सातारा जिल्ह्यासाठी असं रामराजे नाईक निंबाळकरांनी म्हटल आहे दरम्यान यामुळे रामराजे नाईक निंबाळकर कोणता मोठा निर्णय घेणार का अशा चर्चांना उधाण आलं आहे.
Comments are closed.