महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून मनसे नेते व शिवडीचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी जात भेट घेतली आहे.
शिवडी मतदार संघात मनसेचे उमेदवार असणाऱ्या बाळा नांदगावकरांना भाजप व महायुतीने पाठिंबा दिला आहे त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटाचे अजय चौधरी विरुद्ध बाळा नांदगावकर अशी लढत होत आहे.
फडणवीसांसोबतच्या बैठकीत काय झालं?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन झाल्यानंतर बाळा नांदगावकर म्हणाले, आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मुलाचं लग्न आहे. म्हणून ते सकाळी राज ठाकरेंकडे आले होते. त्यांनी राज ठाकरेंना पत्रिका दिल्यानंतर ते देवेंद्र फडणवीसांकडे पत्रिका द्यायला जात होते. ते म्हणाले की चला सोबत, म्हणून मीही त्यांच्याबरोबर आलो
ते पुढे म्हणाले, “या भेटीदरम्यान मी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. तसंच, निवडणुकीत त्यांनी मला पाठिंबाही दिला होता, म्हणून मी त्यांचे आभार मानले