धक्कादायक ! मानवी रक्तात आढळून आले प्लास्टिकचे सूक्ष्म कण

386 0

लंडन- दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, खेळणी, ‘यूज अँड थ्रो’ काटे-चमचे यातील प्लास्टिकचे बारीक कण मानवी रक्तात आढळून आले आहेत. एका संशोधकांच्या गटाने याबाबतचे संशोधन केले असून त्यातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ‘एन्व्हायर्न्मेंट इंटरनॅशनल ’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

प्लास्टिकच्या वापराचे काही फायदे असले तरी अनेक तोटेदेखील आहे. प्लास्टिकमुळे निसर्गाची हानी होते. याच कारणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गप्रेमी विविध सामाजिक संघटना, जागरूक नागरिक अशा अनेकांकडून प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र प्लास्टिकचा वापर काही कमी होण्याचं लक्षण दिसत नाही. आता प्लास्टिकचा मानवी शरीरावरदेखील विपरीत परिणाम होत असल्याचं आढळून आलं आहे.

दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंमधील अत्यंत बारीक तुकडे मानवी शरीरातील रक्तामध्ये आढळून आले आहेत. डच संशोधकांनी केलेल्या नव्या संशोधनात 22 निरोगी व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 17 जणांच्या रक्तात मायक्रोप्लास्टिक आढळून आलं आहे. हे तुकडे शरीराच्या आत जातात आणि अवयवांमध्ये चिकटतात आणि त्यांना ब्लॉक करतात. हे संशोधन नेदरलँडमध्ये करण्यात आलं. संशोधनात सहभागी असलेल्या सर्व 22 व्यक्ती पूर्णपणे निरोगी होत्या आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता; मात्र संशोधनाअंतर्गत केलेल्या चाचणीच्या नमुन्यात प्लास्टिकचे कण आढळल्याने संशोधकांना आश्चर्याचा धक्का बसला.

पॉलिथिलिन टेरेफ्थालेट (पीईटी), पॉलिथीन आणि पॉलिमर्स हे रक्ताच्या नमुन्यांमध्ये आढळणारे प्लास्टिकचे सर्वांत सामान्य प्रकार होते. पॉलिप्रॉपीलिनचेही विश्लेषण केले गेले. मात्र, मोजमापासाठी ते अत्यंत कमी होते. ‘मानवी शरीरातील रक्तात प्लास्टिक असल्याचे आता सिद्ध झाले आहे,’ असे अ‍ॅमस्टरडॅम येथील व्रिजे विद्यापीठातील इकोटॉक्सिकॉलॉजिस्ट हिथर लेस्ली यांनी सांगितले. या अभ्यासानुसार एक माणूस दररोज सुमारे सात हजार मायक्रोप्लास्टिक कण शरीरात घेतो. या संशोधनात आठ वर्षांच्या मुलीच्याही रक्ताची तपासणी करण्यात आली. या मुलीच्या रक्तातदेखील मायक्रोप्लास्टिकचे अनेक कण आढळून आले.

यापूर्वी केलेल्या एका संशोधनात संशोधकांना मायक्रोप्लास्टिकचे कण मानवी मेंदू आणि पोटात, तसंच अगदी न जन्मलेल्या बाळांच्या नाळेलाही चिकटलेले असल्याचं आढळलं होतं. त्यातले काही शौचावाटे बाहेर पडले; मात्र रक्तात मायक्रोप्लास्टिकचे कण सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.

असा केला अभ्यास…

– सोड्याच्या आणि पाण्याच्या बाटल्यांमध्ये ‘पीईटी’ आढळते; तसेच कंटेनर, दुधाच्या बाटल्यांमध्ये आणि वाणसामानाच्या पिशव्या, खेळणी यांच्यात पॉलिथिलीन, तर टाकाऊ चाकू, सुऱ्यांमध्ये पॉलिमर आढळते.

– अभ्यासात 22 सहभागींचा समावेश होता. त्यांच्या रक्तातून पाच विविध प्रकारच्या पॉलिमरची तपासणी करण्यात आली.

– दैनंदिन पर्यावरणातूनही माणसांच्या शरीरात प्लास्टिक शोषले जात असल्याचे प्रयोगशाळेतील प्रयोगांवरून दिसून आले.

– 22 रक्तदात्यांमध्ये मिळून 1.6 मायक्रोग्रॅम इतके प्लास्टिक आढळले.

Share This News

Related Post

बहिरेपणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 3 मार्च रोजी विश्व बहिरेपणा दिन करतात साजरा

Posted by - March 3, 2022 0
बहिरेपणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी तीन मार्च रोजी विश्व बहिरेपणा दिन पाळला जातो. त्याद्वारे बहिरेपणाबाबत समाजात जागृती करण्यात येते. सध्या हेडफोनसह…
Sex

Sex : बेडवर नाही तर ‘या’ ठिकाणी सेक्स करणं असू शकतं एक्सायटिंग

Posted by - August 4, 2023 0
सेक्स (Sex) ही दोन व्यक्तींमधील इंटीमसी असते आणि यात आपल्या जोडीदाराला सुख मिळावं अशी स्त्री-पुरुष दोघांचीही इच्छा असते. आज आपण…
Shanta Tambe

Shanta Tambe: अभिनेत्री शांता तांबे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन

Posted by - June 19, 2023 0
मुंबई : मनोरंजन सृष्टीतून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे (Shanta Tambe) यांचे…

WhatsApp Features : 2022 मध्ये व्हॉटसअपने आणलेले इंटरेस्टिंग फीचर्स

Posted by - December 28, 2022 0
भारतात कोट्यवधी लोकं स्मार्टफोन वापरतात. स्मार्टफोन युजर्सचे पसंतीचे अँप म्हणजे व्हॉटसअप. व्हॉटसअप कंपनीही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *